भीमाशंकर अभयारण्यात मधमाश्या महोत्सव – आदिवासींचा उपक्रम (in Marathi)

By अनुवादक अनुराधा अर्जुनवाडकर, मूळ लेखक अशीष कोठारी on Apr. 04, 2017 in Environment and Ecology

Translated specially for Vikalp Sangam

(Bhimashankar Abhayaranyaat Madhmaashyaa Mahotsav – Adivasincha upakram)

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील गारबेवाडी (भोरगिरी) व येळवली गावांनी कल्पवृक्ष संस्थेसह भोरगिरी येथे 1 एप्रिल 2017 रोजी आयोजित केलेल्या मधमाश्या महोत्सवातील काही क्षणचित्रे.

वन्य मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व अन्य स्थानीय पदार्थांचे प्रदर्शन व विक्री, मुलांसाठी लिहिलेल्या मधमाश्यांवरील कथेचे वाचन, स्थानीय लोकांची, कल्पवृक्षच्या प्रतिनिधींची व ‘हनीबी नेएटवर्क’च्या सदस्यांची सादरीकरणे, आणि चित्र रंगवणे… अशी खूप मौज!

गेली काही वर्षे वन उपजांवर आधारित उपजीविकांना प्रोत्साहन देण्याचे स्थानीय महिलांच्या जय सत्गुरू स्व-मदत गटासह कल्पवृक्ष व अन्य गटांचे प्रयत्न सुरू आहेत. वनाधिकार कायद्याखाली समुदायांच्या वनाधिकारांसाठी दावे दाखल करण्यास मदत करण्याचे कल्पवृक्षचे कार्यही सुरू आहे. निसर्गसंरक्षणासाठी योजना, समुदायाच्या द्वारे निसर्गस्नेही पर्यटन (इको-टूरिझम) योजना वगैरेचे कार्यही सुरू आहे.

गटाधिकारी मंदा वसंत काटे व वंदना अंकुश काटे यांच्यासह जय सत्गुरू महिला बचत गटाच्या सदस्या

मध व अन्य पदार्थांसह जय सत्गुरू महिला बचत गटाच्या सदस्या 

येळवली गावातील सुभाष डोळस कल्पवृक्षबरोबर काम करतात. त्यांनी केलेले सादरीकरण.

तानया मजमुदार यांनी लिहिलेल्या मधमाश्यांवरील बालकथेचे वाचन करताना कल्पवृक्षच्या राधिका मुळे

महोत्सवाची माहिती देताना कल्पवृक्षाचे प्रदीप चव्हाण+

भोरगिरीच्या भोराबाई धोंडू आंबेकर, मध संकलन करणा-या ऐकमेव महिला


भोरगिरीचे मध संकलक, आपल्या कामाची माहिती देताना

मधमश्यांची चित्रे रंगवणारी मुले

मूळ लेख Honey Bee Festival by Adivasis in Bhimashankar Sanctuary areaStory Tags: , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Story Categories
Explore Stories
Stories by Location
Events
Recent Posts