आम्ही सारेच काही दिव्यांगी नाही (in Marathi)

By Translated by Anuradha Arjunwadkar; Original opinion piece (in English) by Parul GhoshonNov. 06, 2016in Perspectives

‘रिओ पॅरालिंपिक्स’चा ट्रेलर हृदय पिळवटून टाकणारा आहेच, पण त्याच बरोबर तो अक्षमता असलेल्या (डिझेबल्ड) व्यक्ती या ‘प्रेरणा वस्तू (इन्स्पिरेशन पॉर्न)’ असाव्यात, अशा तऱ्हेने सादर करतो…

‘अक्षमता असलेले लोक फार प्रेरणादायक असतात; बघा, ते अक्षमतेचे एवढे ओझे कसे लीलया पेलतात!’ असा एक गैरसमज आहे.

अक्षमता असलेल्या लोकांकडे पाहण्याच्या समाजात दोन तऱ्हा दिसतात : एक तर त्यांच्याकडे प्रेरणादायी वस्तू म्हणून पाहतात, नाहीतर मग करुणाजनक वस्तू म्हणून. दोन्ही प्रकारांत अक्षमता असलेली व्यक्ती ही अक्षमता नसलेल्या (नॉन-डिझेबल्ड) व्यक्तीच्या नजरेत केवळ एक वस्तू असते. असे अनेक बातम्यांतून पुढे येते. उदा. चाकांच्या खुर्चीतील पुरुषाला रेस्टॉरंटचा कर्मचारी खायला मदत करताना दिसतो. एका चित्रात एक तरुण पुरुष, पावले गमावलेली असतानाही, धावण्यासाठी विशेष साधने – रनिंग ब्लेड्सच्या साह्याने वेगात निघालेला आहे असे दिसते, आणि चित्राखाली लिहिले आहे : ‘आयुष्यातील एकमेव अक्षमता म्हणजे सदोष वृत्ती!’

पिस्टोरिअस – रनिंग ब्लेड्स सह
पिस्टोरिअस – रनिंग ब्लेड्स सह (विकिपीडिया वरुन)

अक्षमतेच्या प्रश्नांवर काही काम करणारे लोक इंग्रजीत याला ‘इन्स्पिरेशन पॉर्न’ असे म्हणतात – म्हणजे अक्षमता असलेल्या लोकांचा एखाद्या कथेतील किंवा लेखातील केवळ एक वस्तू म्हणून केलेला वापर, ज्यामुळे अक्षमता नसलेल्या लोकांना स्वतःच्या जीवनाबद्दल किंवा मनुष्यजातीबद्दल काही भले-चांगले वाटते. स्टेला यंग यांनी हा शब्दप्रयोग पहिल्याने केला होता.

५ एप्रिल २०१६ रोजी हफिंग्टन पोस्ट ने प्रकाशित केलेल्या ब्लॉग वरून. लेखिका – साराह ब्लाओवेक

माझ्या मित्रमंडळींत लेखक, छायाचित्रकार, रचनाकार, संगीतकार व  निर्मातेही आहेत. या सर्वांत मी नेहमीच वेगळी ठरते. त्यांच्या दृष्टीने मी अक्षमता आणि विकास (डिझबिलिटी अँड डेव्हलपमेंट ) या क्षेत्रात काम करणारी ‘ती’ मुलगी आहे. मला खात्री वाटते की मी प्रत्यक्ष काय करते, हे त्यांच्यापैकी कुणालाच माहीत नसणार. याने माझे सहसा काही बिघडत नाही, पण जेव्हा एखादा ‘टेड टॉक’ ऐकून लोकांच्या डोळ्यांत पाणी येते, तेव्हा इतके जण ती ‘लिंक’ मला पाठवून ‘हे पाहून तुझी आठवण झाली’ असे पालुपद लावून धरतात, की मी बेजार होते. चॅनेल फोर’ने जेव्हा रिओ २०१६ पॅरालिंपिक्सचा ट्रेलर प्रसारित केला तेव्हाही असेच झाले.

ट्रेलरमधील भाषा

ट्रेलर उत्तम आहे. परिणामकारक आहे. हृदयद्रावक आहे. आणि तो खरेखुरे लोक – अक्षमता असणारे काही खेळाडू – दाखवतो. त्याचे संगीत व लय समर्पक आहेत. त्यामुळे डोळ्यांत पाणी येते. हा ट्रेलर लोकांनी पहावा, इतरांना पहायला सांगावे, कारण क्वचितच कोणी अक्षमता या विषयावर बोलत असेल. भारतात तर अक्षमता असलेले लोक इतरांसाठी जणू अदृश्यच असतात, कारण त्यांच्यासाठी आवश्यक आणि योग्य अशी व्यवस्था (नोकरी-व्यवसायांत, तसेच जाण्या-येण्यासह अनेक बाबतीत) कुठेच केलेली नसते. त्यामुळे अशा उल्लेखनीय ट्रेलरद्वारा  अक्षमता या विषयाकडे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे कार्य घडू शकते.

पण यात एक अडचण आहे. या ट्रेलरमध्ये अनेकदा ‘सुपर-ह्यूमन्स’ – अति-मानवी, अलौकिक, किंवा दिव्य क्षमता असलेल्या व्यक्ती असा उल्लेख होतो, अन तो ऐकून प्रत्येक वेळी मी अस्वस्थ होते. तसा हा शब्द पॅरालिंपिक्सच्या  संदर्भात नवीन नाही. २०१२ सालच्या लंडन पॅरालिंपिक्सच्या वेळीही ‘चॅनेल फोर’ने आपल्या जाहिरातीत ‘सुपरह्युमन्सची भेट’ अशा अर्थाचे शब्द वापरले होते.

जागतिक अक्षमता चळवळीचा आढावा घेतला तर लक्षात येते की अशा व्यक्तींना ‘असामान्य’ मानण्याच्या विरुद्धचा लढा अनेक देशांत अजूनही सुरु आहे. हे खेळाडू खरोखरच विलक्षण आहेत. आणि त्यांचे कष्ट आणि जिद्द यांना कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही. पण अक्षमता ही बाब आपणा सर्वांसमोर एक ‘प्रेरणा वस्तू – (इन्स्पिरेशन पॉर्न)’ म्हणून ठेवण्याची संकल्पना गैर आहे.

On target: “When a video this striking comes along, it comes with a lot of potential for giving disability the attention it deserves.” A video grab from Channel 4’s Rio Paralympics tralier.
नेम साधला : “जो विडिओ अक्षमतेच्या प्रश्नाचा असा नेमका वेध घेतो, त्याची लोकांना अक्षमतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास भाग पाडण्याची ताकत मोठी आहे.” ‘चॅनेल फोर‘ या सार्वजनिक-सेवा देणाऱ्या ग्रेट ब्रिटन देशातील टी. वी. चॅनेलने प्रसारित केलेल्या ‘रिओ पॅरालिंपिक्स‘ वरच्या जाहिरातपटातून (ट्रेलर मधून ) निवडलेले हे वाक्य. फोटो : यूट्यूब

एकदा एका कॉलेज व्याख्यात्यांनी अक्षमता असलेल्या मुलाच्या अत्यंत बेचैन अशा आईचा किस्सा मला ऐकवला होता. त्या वेळी ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यात दाखवले आहे की ‘डिस्लेक्सिया’ असलेल्या आठ वर्षांच्या एका मुलाला त्याच्या एका शिक्षकाच्या अथक प्रयत्नांमुळे चित्रकलेत यश कसे मिळवता आले. पण या आईच्या अक्षमता असलेल्या मुलाला चित्रकलाच जमत नसल्याने त्याच्या भवितव्याचा तिला घोर लागला. अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी सामान्य असण्याला वाव नाही; यश मिळाले नाही तरी हरकत नाही, असे वाटण्याची मुभा नाही, हे आमच्या व्याख्यात्यांनी खेदाने स्पष्ट केले. एक तर अशा स्थितीमुळे अयशस्वीतेसह येणारी संपूर्ण असहाय्यता वाट्याला येते, नाही तर पराकोटीचा असाधारणपणा, दिव्यत्व – ‘सुपरह्युमन’पण .

योग्य शब्दरचना

वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्ती या बाबतीत विविध शब्दरचना करतात. अनेकजण ‘हॅंडीकॅप्ड’ म्हणत असले तरी बहुतेकजण ‘अक्षमता असलेली व्यक्ती’ असा उल्लेख केलेला पसंत करतात. पूर्वी अशा परिस्थितीला ती व्याक्तीच जबाबदार असल्याचे मानले जात असे, ते आता (पाश्चात्य देशांत तरी) मागे पडले आहे. त्यांच्या अधिकारांवर आता लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या शब्दप्रयोगांना आता महत्त्व आले आहे. आपण त्यांच्याबद्दल आदराने बोलत असतानाच त्यांना (लंगडा, आंधळा, किंवा दिव्यांगी, सुपरह्युमन सारखी) विशेषणे लावणे हे योग्य वाटते का?  

पॅरालिंपिक्सवरच्या या ट्रेलरला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. अक्षमतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहेच. पण ‘तारे जमीन पर’चा त्या आईवर जो परिणाम झाला तसा, सामान्यपणासाठी वावच नष्ट करण्याचा परिणाम या ट्रेलरमुळे लाखो लोकांवर न होवो.

मूळ प्रकाशक पुरोगामी जनगर्जना

Read original opinion piece (in English) by Parul Ghosh

या लेखाचा तमिळ अनुवाद

Story Tags: , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...
%d bloggers like this: