भीमाशंकर अभयारण्यात मधमाश्या महोत्सव – आदिवासींचा उपक्रम (in Marathi)

By अनुवादक अनुराधा अर्जुनवाडकर, मूळ लेखक अशीष कोठारीonApr. 04, 2017in Environment and Ecology

Translated specially for Vikalp Sangam

(Bhimashankar Abhayaranyaat Madhmaashyaa Mahotsav – Adivasincha upakram)

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील गारबेवाडी (भोरगिरी) व येळवली गावांनी कल्पवृक्ष संस्थेसह भोरगिरी येथे 1 एप्रिल 2017 रोजी आयोजित केलेल्या मधमाश्या महोत्सवातील काही क्षणचित्रे.

वन्य मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व अन्य स्थानीय पदार्थांचे प्रदर्शन व विक्री, मुलांसाठी लिहिलेल्या मधमाश्यांवरील कथेचे वाचन, स्थानीय लोकांची, कल्पवृक्षच्या प्रतिनिधींची व ‘हनीबी नेएटवर्क’च्या सदस्यांची सादरीकरणे, आणि चित्र रंगवणे… अशी खूप मौज!

गेली काही वर्षे वन उपजांवर आधारित उपजीविकांना प्रोत्साहन देण्याचे स्थानीय महिलांच्या जय सत्गुरू स्व-मदत गटासह कल्पवृक्ष व अन्य गटांचे प्रयत्न सुरू आहेत. वनाधिकार कायद्याखाली समुदायांच्या वनाधिकारांसाठी दावे दाखल करण्यास मदत करण्याचे कल्पवृक्षचे कार्यही सुरू आहे. निसर्गसंरक्षणासाठी योजना, समुदायाच्या द्वारे निसर्गस्नेही पर्यटन (इको-टूरिझम) योजना वगैरेचे कार्यही सुरू आहे.


मूळ लेख Honey Bee Festival by Adivasis in Bhimashankar Sanctuary area

लेखकाशी संपर्क

Story Tags: , , , , ,

Leave a Reply

Loading...