मित्रांनो,
ग्राम आर्ट प्रकल्प हा समविचारी लोकांचा गट मध्य प्रदेशातील पारडसिंगा गावात तेथील रहिवासी व शेतकरी यांच्याबरोबर तीन वर्षांपासून कलेचे वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटाला ग्राम धरा चित्र उत्सवाच्या दरम्यान आम्ही बीज महोत्सव भरावीत आहोत. या लँड आर्ट साठी आम्ही समाज सेवक, कलाकार आणि स्थानीय शेतकरी यांना एकत्र आणून सद्ध्याच्या स्थितीत शेतीविषयीच्या प्रश्नांवर ७ शेतांमध्ये ७ वेगवेगळी चित्रे साकारण्यात आली आहेत. ती पाहायला येणाऱ्या पाहुण्यांमुळे गावाची भरभराट होईल.
शेतांत चित्रे जोपासणाऱ्या विद्यार्थ्यान्ची व स्त्रियांची नावे :
परविंदर सिंग, मालती कापसे, राधा लोही, पूजा लोही, आदर्श ढोके, नवकेश टाकेडे, पार्थ सूर्यवंशी, कुणाल हुमणे व संदेश कानडे.
या प्रकल्पात सहभागी झालेल्या सुनंदा जोशी यांच्या डायरीतील काही मजकूर येथे पाहावा.
श्वेता भट्टड यांच्या ई-मेल मधून